विवाह आणि घटस्फोट – १

शुक्र – युरेनस/ शुक्र – नेपच्यून हे अशुभ योग विवाहाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतात हे आपण पाहिले आहेच पण आणखी काही योग/ ग्रहस्थिती घटस्फोट/ तीव्र स्वरूपाचे वैवाहिक असमाधान दाखवतात.याचे एक उदाहरण म्हणजे ही पत्रिका (RSK 2302).

या पत्रिकेचे तपशील: १९ एप्रिल १९९९, सकाळी ०७:१५ , पुणे. स्त्री जातक.

(जन्मवेळ +/- 5 मिनिटांत आहे)

पत्रिकेत लग्नात रवी – शनी राश्यात्मक युती आहे, सप्तमात वक्री मंगळ लग्नातल्या शनिशी पूर्ण अंशात्मक प्रतियोगात आहे! रवी, शनी, मंगल हे दशमातल्या युरेन्स – नेपच्यून जोडगोळी बरोबर केंद्र योग करत आहेत! किती स्फोटक रसायन आहे हे, बघून अंगावर काटा येतो!

द्वितीय स्थानात वृषभेतली चंद्र – शुक्र शुभ युती केव्हाच पालापाचोल्यासारखी भिरकावली गेली आहे. या शुभ युतीने फळे दिली नाहीत असे नाही, धनस्थानातली शुभ युती असल्याने जातकाचा जन्म श्रीमंत घरात झाला, सासर देखील तोलामोलाचेच , अति श्रीमंत असे मिळाले.

पैशाची उधळण करत, अत्यंत दिमाखदार, अगदी स्वप्नवत वाटेल असा देखणा विवाह सोहळा झाला पण अवघ्या तीन वर्षात हा विवाह पत्त्याच्या बंगल्या सारखा कोसळला देखील.

विवाह: जून 2021, घटस्फोट: मे 2024.

ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी या पत्रिकेतल्या ग्रहयोगांचा अभ्यास करावा, आपल्या आवडत्या/ सरावाच्या कालनिर्णय पद्धती नुसार विवाह – घटस्फोटाच्या तारखा जुळतात का हे तपासावे. (ज्योतिषाचा अभ्यास असा करायाचा असतो!)

पत्रिका (RSK 2302). १९ एप्रिल १९९९, सकाळी ०७:१५ , पुणे. स्त्री जातक

विवाह जून 2021

जून 2021 महिन्याचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट

जन्मस्थ शुक्र – प्रोग्रेस्ड लग्न बिंदू च्या पूर्ण तंतोतंत युतीत आहे, हा नि:संशय विवाहसूचक योग आहे!

पत्रिका (RSK 2302). १९ एप्रिल १९९९, सकाळी ०७:१५ , पुणे. स्त्री जातक.

घटस्फोट: मे 2024

मे 2024 महिन्याचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट.

जन्मस्थ प्लुटो – प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू च्या पूर्ण तंतोतंत युतीत आहे, हा नि:संशय अशुभ योग आहे जो घटस्फोट सुचवतो!

चार्ट मध्ये प्रोग्रेस्ड शुक्र – जन्मस्थ मंगळ नवपंचम आहे, नवपंचम योग जात्याच शुभ मानला गेला असला तरी शुक्र – मंगळ योग विवाहाच्या संदर्भात अशुभ ठरतात असा अनुभव आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *