कोणीतरी असे पटापट…

कोणीतरी असे पटापट…

माझा मुलगा चि यश सतत काहीतरी ऑन लाईन मागवत असतो, कुरियर वाला आला नाही असा दिवस जात नाही. आता कालचेच पहा ना, दुपारी ४ वाजता यशचा फोन आला…

“बाबा, माझे एक अर्जंट पार्सल आज येणार आहे ते आले का ?”

“नाही आज कोणतेच कुरियर आले नाही”

“असे कसे, आज हे पार्सल नक्की यायला हवे होते”

“येईल रे, आत्ताशा ४ तर वाजताहेत, हे कुरियर वाले अगदी सात-आठ वाजे पर्यंत डिलिव्हरी करतात , अजून वाट आहे “

“ते ठीक, पण मला ते पार्सल आज मिळायलाच हवे”

“आता ते माझ्या हातात नाही”

“येस, पण तुम्ही होरारी एक्सपर्ट ना, मग तुम्हाला कळू शकेल ना आज डिलिव्हरी होईल का आणि ती केव्हा?”

“होरारी चार्ट? बेटा इतक्या लहान सहान, रूटीन कामासाठी होरारी चार्ट? नाही रे, होरारी तंत्राचा हा दुरुपयोग ठरेल, चेष्टा होईल “

“सगळ्या गावाचे भविष्य सांगता आणि आता माझ्या साठी नाही?“

“हे तर सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे”

“येस इट इज, तेव्हा आज हमकू वो होरारी चार्ट मंगताच है”

सॉफ्टवेअर चालू केले आणि होरारी चार्ट तयार केला :

२४ जून २०२६, दुपारी ४:१२:२९ , पुणे, सायन, रिजिओमोनट्यानस

प्रश्नकर्ता (यश): वृश्चिक लग्न आहे, लग्नात कोणताच ग्रह नसल्याने, लग्नेश मंगळ आणि जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी चंद्र चि यश चे प्रतिनिधित्व करतील.

पार्सल: हे दोन प्रकारे पाहता येईल, आम्ही त्याचे पैसे मोजले आहेत त्यामुळे ती वस्तू आमच्या मालकीची आहे म्हणून ‘द्वितीय भावा’ वरून.

किंवा जो पर्यंत पार्सल आम्हाला डिलिव्हर होत नाही तो पर्यंत ते पार्सल पाठवणाऱ्या कुंपणीच्या मालकीचे मानले जाईल , जर पार्सल डिलिव्हर होऊ शकले नाही / डिलीव्हरी नाकारली गेली तर ते कुंपणीची वस्तू म्हणून कुंपणी कडे परत जाईल. त्यानुसार विक्रेत्याच्या द्वितीय भावा वरून म्हणजेच अष्टम भावा वरुन देखील पार्सल चा विचार होऊ शकतो.

पत्रिकेत द्वितीय भावावर धनु रास आहे, द्वितीयात कोणताही ग्रह नाही म्हणजे द्वितीयेश गुरु पार्सल चे प्रतिनिधित्व करेल. या गुरूचे मंगळ अथवा चंद्राशी होणारे योग सांगतील की हे पार्सल मिळणार का? आणि केव्हा?

सप्तमातला वृषभेतचा मंगळ (यश) आणि नवम स्थानातल्या कर्केतल्या गुरु (पार्सल) यांच्यात 2 अंशात लाभ योग होत आहे. गुरु (पार्सल) आणि चंद्र (यश) यांच्यातही नवपंचम होत आहे, पार्सल मिळणार, आजच!

दुसऱ्या विचारा नुसार विक्रेत्याचे द्वितीय स्थान म्हणजे अष्टम स्थान, इथे मिथुन रास आहे, अष्टमात रवी आहे म्हणजे रवी आणि बुध पार्सल चे प्रतिनिधित्व करत आहेत.बुध (पार्सल) नवम स्थानात आहे आणि सप्तमात असलेल्या मंगळाशी (यश) 1:41 अंशात लाभ योग करत आहे. चंद्र (यश) – बुध (पार्सल) आणि चंद्र (यश) – रवी (पार्सल) यांच्यातही योग होत आहेत. पार्सल मिळणार, आजच!

तिसरा विचार हा की बुध जर पार्सल चा प्रतिनिधी मानला तर तो जन्मलग्न बिंदू (यश) शी योग करणार आहे, जन्मलग्न बिंदू 23:02 वृश्चिक वर आहे, तो बिंदू 25:11 वृश्चिकेवर आला की त्याचा बुधाशी चा २ अंशात नवपंचम योग होईल.

इतकी कन्फर्मेशनस असताना आज पार्सल मिळाले नाही तर आश्चर्य!

पार्सल मिळणार हे नक्की. पण केव्हा? आता पार्सल येणार हे सांगणारे सर्व योग 1.5 ते 2 अंशात असल्याने, साधारण 2 अंश हे परिमाण असेल, म्हणजे 2 मिनिटे- 20 मिनिटे – 2 तास – 20 तास असे कालमापन होऊ शकते. 2 मिनिटे , 20 तास अव्यवहार्य आहे, 20 मिनिटे का 2 तास?

बराच विचार करून मी 2 तास हे युनिट निश्चित केले. 4:12 PM ची पत्रिका होती, त्यात दोन तास मिळवले तर 6:12 PM होतात, तेव्हा साधारण पाने 6 च्या सुमारास पार्सल हातात पडेल असा निष्कर्ष मी काढला.

**** पार्सल बरोबर 6 : 03 PM ला हातात पडले. ****

Similar Posts

  • |

    Evangeline Smith Adams – 9

    दुसरा दिवस उजाडला. अ‍ॅडलीची साक्ष संपल्याने आता  सरकारी वकिलांनी बाईंना विटनेस बॉक्स मध्ये बोलावले. सरकारी वकिलांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. “मिस अ‍ॅडॅम्स, तुमच्या वर ‘तुम्ही फ़ॉरच्युन टेलींग करता’ हा आरोप आहे हे आपल्याला मान्य आहे ?” “नाही” पुढे चालू …   …

  • |

    काही फटू !

    हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्‍यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे ! (मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी…

  • |

    छापा मी जिंकलो , काटा तू हरलास !

    समक्ष भेटायला आलेल्या जातकीचा प्रश्न होता ‘विवाह कधी होणार ?’… असे प्रश्न हाताळणे माझ्या साठी एक रुटीन झाले आहे कारण येणार्‍या ७० % जातकांचे प्रश्न विवाहा संदर्भातच असतात ! असो. मी माझ्या पद्धतीनुसार जातकीची माहीती लिहून घ्यायला सुरवात केली. नेहमीची बेसीक…

  • |

    संधी !

      (ही कथा मी 2006 साली ‘मनोगत’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली होती, माझ्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोयी साठी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देत आहे. ही कथा 1960 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत आहे. मला ज्या व्यक्ती कडून हा प्रसंग कळला ती…

  • |

    डायल्स ची डिलिव्हरी..

    मध्यंतरी मी युरेनियन ज्योतिष पद्धती साठी आवश्यक असलेल्या  90 /45 डिग्री डायल्स परदेशातुन मागवल्या होत्या, साधारण पणे 25 ते 30 दिवसांत त्या मिळतील अशी अपेक्षा होती पण  तब्बल 50 दिवस झाले तरी त्या पोहोचल्या नाहीत. मला जरा काळजी वाटायला लागली. काय…

  • |

    जातकाची प्रश्नोत्तरें

    सौ. क्ष सप्रेम नमस्कार, आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही  खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे. ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्‍याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते. फक्त ज्याला आपण ईंग्रजीत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *